अपघातग्रस्ताच्या मदतीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले धावतात तेव्हा…

रामटेक : कौटुंबिक कार्यक्रमासाठी रामटेकला येत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांनी माणुसकीचा परिचय देत अपघातात जखमीला झालेल्या एका व्यक्तीला स्वत:च्या गाडीत घेत रामटेकच्या शासकीय रुणालयात भरती केले.

पटोले हे सोमवारी सकाळी ११.३० वाजता दरम्यान कौटुंबिक कामासाठी नागपूर-मनसर महामार्गाने रामटेक येथे येत होते. याच काळात रामटेकचे उमेश दुबे हे बाईकने नागपुरला जात होते. ते रेल्वेत नौकरीवर आहेत. डुमरी परिसरात आल्यावर अचानक दुबे यांच्या बाईकचा टायर फुटला. यात ते रस्त्यावर पडून जखमी झाले. याच दरम्यान पटोले यांची गाडी तेथून जात होती. त्यांनी लागलीच वाहन थांबवित जखमीची चौकशी केली. सोबतच त्याला आपल्या गाडीत घेत तातडीने रामटेकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमीची प्रकृती गंभीर असल्याने रामटेक येथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूर येथे पाठविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here