कारला ट्रकची धडक! बहीण-भाऊ गंभीर; बुटीबोरी ते जाम रस्त्यावरील घटना

वर्धा : ट्रकचालकाने ट्रक भरधाव व निष्काळजीपणे चालवून कारला जोरदार धडक दिली. ही घटना बुटीबोरी ते जाम रस्त्यावर सिंदी रेल्वे-कोंढळी शिवारात 26 फेब्रुवारी रोजी रात्री 11 दरम्यान घडली. यात कारमधील बहीण-भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. यातील फिर्यादी चालक बाबा जगदीश वाघे (31) रा. नवरगाव जि. चंद्रपूर हे कारने नागपूर येथून रात्री 9 दरम्यान, चंद्रपूर येथे जाण्यासाठी निघाले.

दरम्यान, रात्री 11.30 दरम्यान बोरखेडी टोलनाका पार केल्यानंतर काही अंतरावर विरुद्ध दिशेने येणार्‍या ट्रकच्या चालकाने कारला जोरात धडक दिली. या अपघातात कारचे बोनेट पूर्ण दबले असून, चालक व त्याची बहीण प्रियंका जखमी झाली. सदर जखमींना रोडने येत असलेल्या गुलाम मदनी बारसी (रा. नागपूर) यांनी त्यांच्या कारमध्ये घेऊन बुटीबोरी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या प्रकरणी कारचालक बाबा वाघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम.एच. 34 बी. जी. 2434 च्या चालकाविरुद्ध सिंदी रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस हवालदार कैलास हरणे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here