८ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ED कडून अटक! काय आहे प्रकरण

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सलग आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले. त्यानंतर सकाळपासून त्यांची चौकशी सुरू होती.

एकूण चार मालमत्तांची चौकशी सकाळपासून सुरू होती. मलिक यांच्या कुटुंबीयांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची पडताळणी ईडीकडून सुरू होती. छोटा शकील आणि हसीना पारकर जिवंत असताना त्यांच्या निगडीत काही व्यवहार झाले होते. ईडीला यासंदर्भात संशय होता. अखेर ईडीने मलिकांना अटक केली आहे. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून चोवीस तासात कोर्टात हजर करण्यात येणार आहे. यावेळी ईडीकडून मलिकांची रिमांड घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here