अभय अमृतकर यांची शिवसेनेच्या निवासी उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती


वर्धा : जिल्हा कार्यालयात पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अभय अमृतकर यांची निवासी उपजिल्हा प्रमुख पदावर जिल्हाप्रमुख अनिल देवतारे यांनी नियुक्ती जाहीर केली.
संपर्कप्रमुख अनंत गुढे यांचे आदेशाने आगामी होऊ घातलेल्या नगरपरिषदा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकाच्या अनुषंगाने जिल्हाप्रमुख अनिल देवतारे यांचे अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

या बैठकीत अभय अमृतकर यांना पत्र देऊन नियुक्तीची घोषणा करण्यात आली. अभय अमृतकर हे जेष्ठ शिवसैनिक असून यापूर्वी त्यांनी शहर प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.नियुक्ती वेळेस तालुका प्रमुख गणेश इखार, शहर प्रमुख उज्वल काशीकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिलीप भुजाडे, पत्रकार विश्वभूषण तिवारी, सामाजिक कार्यकर्ते, मंगेश धोंगडे, सामाजिक कार्यकर्ते आसिफ शेख, मनिष भुजाडे, पराग कुकडे, डब्बू सरदार यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here