

वर्धा : महामार्गावर जाणाऱ्या वाहनाला हात दाखवून शस्त्र विकत घेण्याची सकती करणाऱ्या तीन युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून तीन तलवारी जप्त केल्या. ही कारवाई तळेगाव (श्या.) ठाण्याच्या हह्दीतील रायनिंग ७ पाईंट धाबा परिसरात केली.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर- अमरावती महामार्ग क्र. ६ वर धाबाजवळ एक युवक वाहनांना हाथ दाखवून शस्त्र विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर पोलिस घटनास्थळावर जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी आरोपीने नाव काकडदरा येथील रहिवासी मंगुसिंग हरिसींग बावरी (वय ३२) असे सांगितले. याबाबत पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता आरोपीकडून ३ धारदार तलवारी त्याची किंमत १५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तळेगाव पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.