गोरगरीब रुग्णांच्या मद्दतीसाठी धावले डॉ. श्रावन शिवरकर! आर्थिक अडचणीमुळे कोरोना महामारीत उपचारापासुन वंचित राहणार्‍या गरजुंना होतोय लाभ

मोहन सुरकार

सिंदी (रेल्वे) : कोरोना आजाराने सर्वत्र हाहाकार उडविला आहे. सर्व दवाखान्यात तुडुंब गर्दी पाहाला मिळत आहे. अशा परिस्थितीत दररोज वाढणारी रुग्ण संख्या थांबविण्यासाठी प्रशासणाने लाॅकडाऊन केल्याने हातावर पोट असणार्‍याची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे. या परिस्थितीत कोरोणासारखा आजारांने बाधीत झाल्यास गोरगरीबासमोर आज महागाड्या झालेल्या उपचाराला कसे समोर जावे. हा मोठा यश प्रश्न निर्माण झाला आहे.

अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतुन मोठ्या कष्टाने एम.बी.बी.एस.ची पदवी घेऊन मागील सात वर्षांपासून शहरात खाजगी वैद्यकीय सेवा देणारे डॉ. श्रावण शिवरकर यांना या बीकट परिस्थितीची जाण झाली आणि त्यांचे मन हेलावले. त्यांनी लागलीच आपल्या मुफ्त उपचार सेवेच्या उपक्रमाबद्दल पालिकेलीतील काॅग्रेसचे गटनेता आशिष देवतळे यांच्या कानावर ही बाब टाकली. लागलीच श्री देवतळे यांनी यासेवेची गरज आणि शहरातील परिस्थितीची जानीव असल्यांने पालिकेच्या नेहरू विद्यालयाच्या नविन अभ्यासकेची इमारत उपलब्ध करुन दिली. सोबतच अनेकानी इतर गोष्टीची मदत केली आणि पालिकेच्या नेहरु विद्यालयाच्या नविन अभ्यासकेच्या इमारतीत सुरु झाला शहरातील नागरीकांच्या रुग्ण सेवेचा हा अनोखा उपक्रम.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात अशरक्षा थैमान घातले आहे. शहरात दिवसागणिक बाधीतांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. सरकारी आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. शिवाय सरकरी रुग्णालयात गेल्यावर कोरोना चाचणी करते आणि नंतर उपचारासाठी परिवाराच्या दुर कुठेतरी नेते या धास्तीमुळे सरकारी दवाखान्यात उपचार करने शहरातील नागरीक टाळतांना दिसत आहे.

परिणामता शहरातील खासगी दवाखाने तुडुंब भरुन वाहत आहे. येथील खासगी डाॅक्टर वेळेच्या पलिकडे जाऊन रुग्णसेवा देत आहे. मात्र वाढती रुग्ण संख्या थांबविण्यासाठी प्रशासणाने संपूर्ण कडक लॉकडॉऊन केले. यामुळे हातावर पोट असणार्‍याची चांगलीच आर्थिक कोंडी झाली त्यांचे जगनेच कठीन झाले आणि त्यांत जर कोरोना सारखा आजार झाला तर खाजगी उपचार झेपणार नाही आणि सरकारी यंत्रणेचे धास्तीमुळे तेथे उपचाराला मन मानत नाही अशा परिस्थितीत या रुग्णांना उपचारापासुन वंचित राहण्यांची वेळ आली आहे.

विशेष म्हणजे कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारात वेळीच उपचार मिळाला तर रुग्ण लवकरातलवकर ठणठणीत बरा होतो. मात्र वेळीच लक्ष दिले नाही तर परिस्थिती आटोक्या बाहेर जाते असे डॉ शिवरकर सांगतात. आणि करिता ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी कणकण आदी सारखे लक्षन जाणवताच अंगावर काढु नका घरच्याघरी उपाय करु नका ताबडतोब मुफ्त उपचार शिबीराला भेट देऊन उपचार घेण्याचे आवाहन डॉ शिवरकर यांनी शहरवासीयांना केले आहे.

वर्धा जिल्ह्य़ातील देवळी जवळील भीडी या छोट्याश्या खेड्यात जन्म झालेले डॉ श्रावण शिवरकर यांच्या घरील परिस्थिती अंत्यत बेताचीच आईवडील मासेमारीचा व्यवसाय करुन दोन मुले आणि पती पत्नी असा चार लोकांचा परीवाराचा गाडा चालवाचे. परंतु आपले मुल शिकावे मोठे साहेब व्हावे अशी मनोमन इच्छा बाळगणाऱ्या आईवडिलांनी अभ्यासाचे आणि कठोर परिश्रमाचे बाळकडु घरातुनच आपल्या मुलांवर बिंबवले. यातुनच डॉ श्रावण यांनी हलाखीच्या परीस्थिती परीश्रमाने २००९ मध्ये एमबीबीएसची पदवी संपादन केली. अप्रान्टीस म्हणुन सिंदी प्राथमीक आरोग्य केंद्रांत त्यांनी काही काळ सेवा दिली आणी इथेच स्थायीक झाले. शहरात २०१४ मध्ये खाजगी दवाखाना टाकुन शहरात रुग्णसेवा सुरु केली.

या उपक्रमाची प्रेरणा…

शहरात रुग्णसेवा करतांना समाजातील गोरगरीबांची जवळुन जाणीव झाली. पैशा अभावी होणारी कुंचबंना जवळुन पाहली. विशेष म्हणजे नुकतेच वेळीच उपचार न मिळाल्याने कोरोनामुळे त्यांच्या मोठ्या भावाचे दुर्दैवाने निधन झाले आणि डॉ. शिवरकर पुर्ण हादरुन गेले. त्यांचे मनावर मोठा आघात झाला. आणि यांच प्रेरणेतून त्यांनी लागलीच या उपक्रमाची मनात मोठ बांधली. आपल्या मनातील उपक्रमाला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांनी मनातुन प्रयत्न केले. आज ते शहरातील गोरगरीब रुग्णांचा आधार बनले आहे.

जनतेला आवाहन….

ताप सर्दी खोकला अंगदुखी आदी कोरोना आजाराची प्राथमीक लक्षन दिसताच घाबरुन जाऊ नये मनात कोणतीही धास्ती न ठेवता सरळ ताबडतोब मुफ्त उपक्रम शिबीराला भेट देऊन उपार घ्यावे. तुम्ही वेळीच काळजी घेतली तर अल्पशा उपचाराने आपण बरे होवू शकतात. उपचार पुर्णतः मुफ्त असुन जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ शिवरकर यांनी केले आहे. सोबतच यासाठी त्यांना काॅग्रेसचे गटनेता आशिष देवतळे, नगरसेवक विलास तळवेकर, शहरातील व्यवसायीक अनिल कोपरकर, फिरोज बेरा, प्रभाकरराव तुमाने, मोहन सुरकार आदींचे मौलाचे सहकार्य लाभल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here