गुदमरणाऱ्या जीवाला टाटा स्टीलचा श्वास; दिवसाला 800 टन ऑक्सिजन पुरवीनार

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे अनेक राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता टाटा स्टील (Tata Steel)ने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दररोज पुरविण्यात येणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यात वाढ केली आहे. पूर्वी दररोज सहाशे टन वैद्यकीय ऑक्सिजन रुग्णालयांना देण्यात येत होता. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. यापुढे दररोज ८०० टन वैद्यकीय ऑक्सिजन पुरविणार आहे. स्टील मंत्रालयाच्या सूचनेनुसार देशातील विविध स्टील प्रकल्प विविध राज्यांना वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करत आहेत.

टाटा स्टीलने बुधवारी (ता.२८) यासंबंधीचं एक ट्विट केलं आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा ८०० टन करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारीचं कंपनीने रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा ६०० टन एवढा करणार असल्याचे म्हटले होते. पण यामध्ये २०० टनांनी वाढ करण्यात आली आहे. कोरोनाविरुद्ध संघर्ष सुरू आहे. आम्ही भारत सरकार आणि राज्यांसोबत एकत्र काम करत आहोत. जेणेकरून मागणीची पूर्तता होईल आणि लोकांचे प्राण वाचू शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here