ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात! 8 गाड्यांचे मोठे नुकसान

पुणे : मुंबई बंगळुरू महामार्गावर एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या वाहनांना धडक दिली. ह्या विचित्र अपघातात एकूण आठ वाहनांचे नुकसान झाले आहे. शनिवारी सकाळी साडे सातच्या सुमारास नवले पुलाजवळ ही घटना घडली. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here