वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार! आर्वी ते पुलगाव रोडवर अपघात

आर्वी : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना मंगळवार 23 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजताच्या दरम्यान, आर्वीपासून जवळ असलेल्या पिपरी फाट्याजवळ घडली. आर्वी ते पुलगाव रोडवरील दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पिपरी फाट्याजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघातात सचिन सुधाकर पखाले ( वय 35) रा. वाल्मीक वाघ आर्वी हा युवक घटनास्थळावरच ठार झाला.

वर्धा येथील हाॅस्पिटलमधून परत येताना पिपरी पारगोठान पुनर्वसन या गावांलगत एका अज्ञात वाहनाने रात्री 9 वाजतादरम्यान, पुलगाव रोडकडून आर्वीकडे येत असताना पिंपरी फाट्याजवळ युवकाच्या दुचाकी नंबर एम. एच. 31 बी. टी. 104 या दुचाकीला धडक दिली. सचिन सुधाकर पखाले हा त्याच्या मुलाला भेटायला वर्धा येथे दवाखान्यात गेला होता. परत येताना या युवकावर काळाने झडप घातल्याने तो अपघातात ठार झाला. या प्रकरणाची पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here