खापरखेडा येथे २ पोलीस एसिबिच्या जाळ्यात; लाँक डाऊन मध्ये धंदे ठप्प झालेल्या रेती व्यवसायिकांकडुन लाच घेताना एंटीकरप्शन ने पकडले

 

खापरखेडा / नागपुर : १३ जुलै २०२०
नागपुर जिल्ह्यातील खापरखेडा पो. स्टे. अंतर्गत दोन पोलीस कर्मचारी यांना आज दुपारी एका रेती व्यवसायिकांकडुन लाच घेतांना एंटीकरप्शन विभागाने रंगेहाथ पकडले.
महादुला कोराडी येथील रेती व्यावसायिक अमितभाऊ सरोदे यांची ८ चक्का गाडी ५ जुन २०२० ला खापरखेडा पोलिसांनी पकडली होती. ही कारवाई खापरखेडा पो. स्टे. चे सुरेंद्र ठाकरे यांनी केली होती. त्यावेळी नाईक सुरेंद्र ठाकरे यांनी नमो अमिताभ ट्रेडर्स चे मालक अमितभाऊ सरोदे यांना पोलिस केस करणार नाही १ लाख रुपये दे अशी मागणी केली. त्यावेळी तडजोड करुन ६० हजार रुपये सुरेंद्र ठाकरे याने घेतले. परंतु पैसे घेऊनही खापरखेडा पोलिसांनी अमित सरोदे आणि त्यांच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा पण दाखल केला परंतु त्यानंतर तुझी गाडी पण सोडवुन देतो. दर महिन्याला तुला गाडी चालवायची असेल तर दहा हजार रुपये दे असे म्हणुन पोलीस कर्मचारी सुरेंद्र ठाकरे यांनी आज ५ हजार रुपये घेण्यासाठी खापरखेडा पोलिस स्टेशन येथे बोलावले. अमितभाऊ सरोदे यांना वारंवार पैशाची मागणी करणाऱ्या सुरेंद्र ठाकरे (डी बी पथक) यांची तक्रार एंटीकरप्शन ला केली त्यानंतर एंटीकरप्शन च्या नागपुर पोलिस निरीक्षक योगिता चाफले यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम बनवुन सापळा रचला. त्यानुसार खापरखेडा पोलिस स्टेशन च्या आवारात अमितभाऊ सरोदे यांना सुरेंद्र ठाकरे यांनी पैसे देण्यासाठी बोलावले. अमित सरोदे यांना डी बी पथकाचे सुरेंद्र ठाकरे यांनी ट्राफिक चे कॉन्स्टेबल अमोल काळे यांचेकडे पैसे देण्यासाठी सांगितले. त्यानंतर पैसे घेताच एंटीकरप्शन ब्युरो ने सुरेंद्र ठाकरे आणि अमोल काळे यांना ५ हजाराची लाच घेताना एंटी करप्शन ब्यूरो ने अटक केली.

*खापरखेडा पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे यांचेवर संशयाची सुई?*

आज दुपारी ४ वाजता झालेल्या या कारवाई होण्याआधी सुरेंद्र ठाकरे यांनी अमितभाऊ सरोदे यांना फोन करुन सांगितले की पोलीस निरीक्षक काळे यांना पैसे द्यायचे आहे. पोलीस निरीक्षक काळे यांच्या संरक्षणाखाली या भागातील अवैध रित्या रेती वाहतुक करणांऱ्यांकडुन दरमहिन्याला देण जाते असे म्हटले जाते अमित सरोदे ना फोनवर सुरेंद्र ठाकरे यांने वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे यांचे नाव घेतले अशी माहिती अमित सरोदे यांनी दिली. . त्यामुळे सदर प्रकरणात आता संशयाची सुई वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे यांचेभोवती फिरत आहे. एंटी करप्शन ब्यूरो च्या पोलिस निरिक्षक चाफले यांचेकडे अमित सरोदे यांचा फोन आहे. त्यामुळे पुढे एंटी करप्शन ब्यूरो कोणाकोणाच्या विरोधात गुन्हा दाखल करते याकडे आता सर्वांचे डोळे लागले आहे.
सदर प्रकरणात एक शिपाई एक लाख रुपयांची लाच कशी मागु शकतो? दर महिन्याला खापरखेडा मार्गाहुन जाणाऱ्या बिना रायल्टी च्या गाड्या पास कशा होतात याची आता ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here