आहार तज्ज्ञांचा सल्ला! नवरात्रीचा उपवास करताय, तर मग फळे खा, साबुदाणा टाळा; आरोग्यावर परिणामाचीही शक्‍यता

चिकणी (जामणी) : नवरात्रोत्सवात अनेक जण सलग नऊ दिवस उपवास करतात. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हिंदू संस्क्रतीमध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. अनेक भाविक नऊ दिवसांचा निरंकार उपवास करून पायात चप्पलही घालत नाहीत. आश्‍विन महिन्यात अगदी हिवाळ्याच्या तोंडावर म्हणजेच क्रतू बदलाच्या आगमनात नवरात्र उत्सव येतो. या उत्सवात उपवास करण्याची प्रथाच पडली आहे.

सलग नऊ दिवस उपवास करणे अंगलटही येऊ शकते. बदललेला आहार आणि त्याच्या वेळा यामुळे आजारही वाढतात. त्यामुळे आठवड्यातून एक उपवास केल्यास आरोग्याला फायदा होतो, असे आहारतज्ज्ञांचे मत आहे. सलग नऊ दिवस उपवास करताना जरा खबरदारी घेतलेली बरी. उपवासाला धार्मिकतेची जोड दिली असली तरीही उत्तम आरोग्याकरिता सतत उपवास करणेही योग्य नाही. सोबतच उपवास करत असताना काय खावे हेसुद्धा महत्त्वाचे आहे. उपवासाच्या दिवसांत साबुदाणा खाण्यावर जास्त भर असतो, पण तो अपायकारक ठरू शकतो.

उपवासाला हे खाणे टाळा

उपवासाच्या दिवशी खाण्यावर विशेष पर्यादा घालणे गरजेचे असते. मेजक्याच वेळी फराळी अल्पोपाहार घ्यावा. तळलेले तेलकट पदार्थ खाऊ नयेत. रोजच्या जेवणातील कोणतेही पदार्थ खाऊ नयेत. विशेष म्हणजे साबुदाणा अधिक प्रमाणात खाणे आवर्जून टाळावे. यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे याचे जास्त सेवन केल्यास मधुमेह, लठ्ठुपणा, रक्‍तदाय, मूतखडा आणि कॅन्सरसाररवे आजार होण्याची संभावना असते. उपवासाकडे आपल्या उच्छाशक्तीचा व्यायाम या दृष्टीने बघावे, पोटभरून फराळ करु नये.

हे खाल्लेले बरे

उपवासाच्या दिवशी स्वाण्याच्या वेळी उच्च फायबरयुक्‍त पदार्थ जसे काजू, फळे आणि उपवासाच्या भाज्या आणी नटांसह उच्च प्रथिनयुक्त पदार्थ खावेत. ब्लॅक कॉफी, चहा, लिकोरिस हर्बल टी प्यावा, विशेष म्हणजे निंबूपाणी घ्यावे. यामुळे पचनशक्‍ती वाढण्यास पदत होते. तसे पाहता फळे खाणे हे उत्तमच आहे.

आहारतज्ज्ञ म्हणतात….

-आहार हा क्रतूनुसार घेतला पाहिजे. हल्ली दिवसाचे तापमान अधिक प्रमाणात आहे. यापुळे सलग उपवास टाळलेलेच बरे.
-वातावरणात उकाडा जास्त असल्यामुळे शरीरातून अधिक प्रमाणात घाम निघतो, यामुळे भोवळसुद॒धा येऊ शकते. उपवास केल्यास फळे खावीत, ज्यूस व दूध प्यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here