खाद्यतेलाच्या किमतीही होणार कमी

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून घरगुती तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आली आहे. किमतींमध्ये होणारी ही वाढ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी क्रूड पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावरील मूलभूत शुल्क २.५% वरून शून्यावर आणला आहे.केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार कच्च्या पाम तेलासाठी असलेला कृषी उपकर २०% वरून ७.५% आणि कच्च्या सोयाबीन तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलासाठी ५% वर आणल्याची माहिती वित्त मंत्रालयाने एका निवेदनात दिली आहे. पामोलिन ऑइल, रिफाइंड सोयाबीन आणि रिफाइंड सनफ्लॉवर ऑइलवरील मूळ शुल्क देखील ३२.५% वरून १७.५% पर्यंत कमी करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने करामध्ये कपात करण्यापूर्वी, सर्व प्रकारच्या कच्च्या खाद्य तेलावर २०% कृषी पायाभूत सुविधा उपकर होता. कपात केल्यानंतर, क्रूड पाम तेलावरील प्रभावी शुल्क ८.२५% असेल, कच्च्या सोयाबीन तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेल प्रत्येकी ५.५% असेल. दरम्यान, १४ राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाने इंधन उत्पादन शुल्कात कपात केल्याचा विरोधकांकडून केला जात होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here