गळफास घेत संपविले जीवन! पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

कारंजा (घाडगे) : तालुक्‍यातील मोर्शी येथील 30 वर्षीय व्यक्‍तीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. छत्रपती देविदास खवशी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. छत्रपती खवशी हा मागील बारा वर्षांपासून नागपूर येथे पत्नी व तीन मुलांसह राहत होता. घर बांधकामाचे काम करणारा छत्रपती हा अधूनमधून आपल्या मोर्शी या मूळ गावी यायचा. नुकताच त्याने नागपूर येथे एक भूखंड खरेदी केला. याच भूखंडाचे पैसे जुळत नसल्याने मागील काही दिवसांपासून तो विवंचनेत होता. अशातच मोर्शी येथे आलेल्या छत्रपती याने नारा. मार्गावरील ‘एआरसी कॉन्व्हेंट जवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

इसमाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती वाऱ्यासारखी परल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी कारंजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here