रात्रीच्या सुमारास भरधाव कारची झाडाला धडक! दोघांचा जागीच मृत्यू

वर्धा : आर्वी मार्गवरील कामठी शिवारात रात्रीच्या सुमारास भरधाव कारची झाडाला धडक दोघांचा जागीच मृत्यू झाला.ही घटना आज पहाटे मॉर्निंगवॉकला गेलेल्या इसमाला आढळून आली. तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. भीषण अपघातात कार मधील दोन्ही मृतांना अक्षरशः गॅस कटर ने गाडीचे पत्रे कापून काढावे लागले. जवळपास पोलिसाना तीन तासानंतर दोन्ही मृतकाना वाहनातून बाहेर काढण्यात यश आले. दोन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.

मृतक प्रज्वल राजेंद्र डंभारे (वय 25), राहुल ओमदेव धोंगडे (वय35) रा. आंजी दोघेही जेवण करण्यासाठी बाहेर जात असल्याचे घरी सांगून गेले. मात्र उशिरापर्यंत घरी पोहचले नाही.जेवण केल्यानंतर दोघेही आपल्या कार क्र. महा.32 सी 8453 या वाहनाने आर्वीकडून आंजीला जात असताना कामठी शिवारात चालकाचा वाहना वरून अनियंत्रित होऊन झाडाला धडक दिली अपघात इतका भीषण होता की दोघेही घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच दोघांना कार मधून काढण्यासाठी कारचे पत्रे कापून बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती आंजी गावात पसरताच शोककळा पसरली. खरांगणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर, विनोद सानप, अमर हजारे यांनी घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा करत अपघाताचा नोंद करून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here