ऑटोरिक्षाचालकाना घोषणेनतरही मदत मिळेना! ३ हजार ४१३ लाभार्थ्यांना प्रतीक्षा; आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करण्याच्या सूचना

राहुल खोब्रागडे

वर्धा : ऑटोरिक्षाचालकांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपयांची मदत करण्याची घोषणा राज्य सरकारने केली असली तरी, कार्यवाहीच्या दिशेने अद्याप पावले पडलेली नाहीत. त्यामुळे मदत केव्हा आणि कशी मिळणार, याकडे ओटे रिक्षाचालकांचे लक्ष लागले आहे. सध्या परमिटधारक ऑटोरिक्षाचालकांना त्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारने १५ एप्रिल रोजी घोषणा करताना ऑटोरिक्षाचालकांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये मदत करण्याचे जाहीर केले आहे. स्थानिक पातळीवरील प्रादेशिक परिबहन कार्यालयांमारफत (आस्टीओ) या निघीचे ऑरटोरिक्षाचालकांना वाटप होईल, असे जाहीर करण्यात आले होते. राज्यातील कोरोनाची वाढती रूणसंख्या पाहता राज्यभरात १५ मे पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले.

खासगी वाहतूक बंद करण्यात आली. यात रिक्षाचालकांचाही समावेश आहे. त्यांची उपासमार होऊ नये, यासाठी त्यांना दीड हजार रुपये मदत सरकारने जाहीर केली आहे. जिल्ह्यात जवळपास ३ हजार ४१३ रिक्षांची नोंदणी असल्याचे सांगण्यात आले. परंतु, या सर्बींना मदत मिळणार कधी? इतर रिक्षा चालकांचे काय, तसेच टॅक्सी, जीप चालकांचे काय़, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. मदतोची तयारी म्हणून आरटीओकडून युनियनच्या अध्यक्षांना एक पत्र देत तयारी म्हणून आधारकार्ड बँकेशी लिंक करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे ही मदत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्‍यता विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

लॉकडाउनच्या काळातील मदत वेळीच द्या

राज्यात लॉकडाउन लागून दोन आठवडे लोटल्यानंतर शासनाने ऑटो रिक्षाचालकांना जाहीर केली. ही मदत केव्हा आणि कशी मिळेल याची कोणतीच तयारी शासनस्तरावर झालेली नसल्याचे चित्र दिसत आहे. यातापर्यंत जाहीर झालेली मदत रिक्षाचालकांना मिळणे अपेक्षित होते. मात्र शासनस्तरावर आतापर्यंत कोणतीच ठोस पावले उचलल्याचे दिसून आलेले नाहो. त्यामुळे ही मदत लॉकडाउन खुलल्यावर रिक्षाचालकांपर्यंत पोहोचेल काय असा संतप्त सवाल रिक्षाचालक करीत आहे.

सरकारने मदत जाहीर केली आहे, ही चांगली बाब आहे. पण, सध्या संचारबंदी असल्यामुळे सर्वच व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे जगणे अवघड झाले आहे. कुटुंबाचा गाढा सामोर ओढायचा कसा हाच विचार सुरू आहे. शासनाच्या मदतीची प्रतीक्षा आहे.

-विजय बेंडे, ऑटोरिक्षाचालक, पवनार

दोन वर्षांपूर्वीच नवा रिक्षा घेतला. काही दिवस सुखाने गेले. नंतर कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. त्यामुळे रिक्षा जागेवरच थांबला होता. आता हप्ता कसा फेडायचा, असा प्रश्न आहे. शासनाने १ हजार ५०० रुपये देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. आमच्याकरिता ही मदत तटपूंजी ठरत आहे.

– राजू गोमासे, ऑटोरिक्षाचालक, पवनार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here