एसटी डिझेलसाठी पुन्हा खासगी पंपावर! खासगी पंपाशी करार; भावात तब्बल २४ रुपयांची तफावत

494128660

वर्धा : रापमचे निम्म्याह्न अधिक कर्मचारी अजूनही विलीनीकरणाचा लढा लढत आहेत. असे असतानाही रापमची प्रवासी वाहतूक पूर्वपदावर यावी यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बाजारपेठ आणि रापमला पुरवठा होणाऱ्या डिझेलच्या दरात तब्बल २४ रुपयांची तफावत येत असल्याने सध्या रापमच्या बसेस डिझेलसाठी पुन्हा खासगी पंपावर जात आहे.

जिल्ह्यात रापमचे पाच आगार आहेत. वर्धा, हिंगणघाट, पुलगाव, आर्वी आणि तळेगाव या पाच आगारांपैकी तळेगाव वगळता इतर चार ठिकाणी रापमच्या मालकीचे आगारातच डिझेलपंप आहेत. पण या चारही डिझेल पंपाला पुरवठा होणारे डिझेल खुल्या बाजारपेठेच्या तुलनेत २४ रुपयांची महाग मिळत असल्याने खासगी पेट्रोलपंपांकडून कोटेशन मागविण्यात आले. त्यानंतर कमी दरात डिझेल देणाऱ्या खासगी पंपाशी करार करण्यात आला आहे. याच करार केलेल्या डिझेलपंपवर सध्या रामपच्या लालपरी डिझेलचा भरणा करण्यासाठी जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here