ड्रायपोर्ट पुर्णत्वाचा अद्याप पत्ताच नाही! बांधलेल्या संरक्षण भिंतीला ही चालले तडे; आज तीन वर्षे झालीत पूर्ण

मोहन सुरकार

सिंदी (रेल्वे) : मोठा वाजागाजा करित २ आॅक्टोबर २०१७ रोजी गांधी जयंतीच्या शुभदिनी बापुच्या पावन स्पर्शाने पुलकीत झालेल्या सेवाग्रामात डीजीटल पध्दतीने थाटात उद्घाटन झालेल्या शहरालगतच्या “ड्रायपोर्ट” नामक प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते ते आजही कासवगतीनेच चालू आहे.
आज २ आॅक्टोबरला तीन वर्षे लोटली तरी प्रकल्पाच्या पुर्णत्वाचा थांगपत्ताच नाही. बांधलेल्या संरक्षण भिंतीलाही तडे चालले आहे.

शहरालगत दिन इंडिया नामक प्रकल्पासाठी १९८५ ला अधिग्रहीत केलेल्या ६५० एकर जमीनपैकी ४०० एकर जमिनीवर “ड्रायपोर्ट” निर्मितीची केंद्र सरकारच्या जेएनपीटी संस्थेने घोषणा केली आणि शहरात तसेच परिसरात डाॅयपोर्टच्या रुपाने नविन आशेचा किरण उगवल्यांने अनेकांच्या चेहर्‍यावर आनंद आणि समाधान दिसू लागले. कारण ३५ हुन अधिक वर्षापासून औधोगिकरणाच्या नावाने ओस पडलेली जमीन यामुळे कामी लागणार होती. चौथ्या पीडीलाही याचा लाभ मिळणार होता.

नागपूर जिल्ह्यात लगतच्या सिंदी रेल्वे वर विशेष प्रेम असणाऱ्या केंद्रीय मंत्री आणि विदर्भातील मोठे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत विशेष लक्ष देत प्रकल्पाला चालना दिली.

ऐवढेच नाही तर गडकरी साहेबानी मुळ जमीन मालक शेतकर्याना सुध्दा जमीनीच्या वाढीव किमंतीत हिस्सेदारी देत पैसे मिळवुन दिले.
सर्व शासकीय सोपस्कार आटपोत “ड्रायपोर्टचे” गांधी जयंती दिनी २ आॅक्टोबर २०१७ डीजीटल पध्दतीने सेवाग्राम येथे थांटात उद्घाटन करण्यात आले. आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा सिंदी रेल्वे या शहराकडे वळल्या. सिंदी शहर रातोरात केंद्रीय पटलावर आले.

तेवढ्याच जोमाने डाॅयपोर्टच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात झाली. सर्वप्रथम जमीन अधिग्रहीत करुन संरक्षण भिंतीच्या कामाला सुरुवात झाली. भिंत उभी झाली आणि आतील कामाला हात लागला. रेल्वे लाईन उभारणीसाठी सिलपाट, गीट्टी आधी सामुग्री येवुन पडली. आतील सिमेंट प्लॅटफॉर्मचे काम सुरु झाले. मात्र नंतर काय उलटफेर झाली काही कळलेच नाही आणि मोठ्या वाज्यागाज्याने सुरु झालेल्या ड्रायपोर्ट नामक ड्रिम प्रकल्पाचे काम मंदावतच गेले. आज तीन वर्ष लोटले मात्र प्रकल्पाचे काम मंद गतीने सुरू होते ते लाॅकडाऊन काळात तीन महिने संपूर्ण बंद राहले. अगोदरच कासवगतीने सुरू असलेले काम मागील एक महिण्यापासुन कधी बंद कधी सुरु अशा पध्दतीने चालु आहे. प्रकल्पाच्या कामाचा वेग पाहता हा तरी प्रकल्प पूर्ण होणार की “दिन इंडिया नामक प्रकल्पा सारखा लुप्त होणार असा प्रश्‍न अनेकजण विचारु लागले आहे.

दर्शनिय भागी लावलेल्या प्रकल्पाच्या फलकावर एजन्सीचे नाव एस. सी. गुप्ता असे लिहिले असुन प्रकल्प पूर्णत्वाची तारिख ३/६/२०१९ अशी नोंद आहे. मात्र आता २०२० संपत आले असुन प्रकल्पाचे काम कासवगतीनेच सुरू असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
दोन ते तीन वर्षांअगोदर बांधलेल्या बांधलेल्या संरक्षण भिंतीला आज जागो-जागी तडे जात आहे मात्र प्रकल्प पूर्ण होण्याचा थांग पत्ता नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here