लवकरात लवकर बैठक बोलवुन समस्या निकाली काढा अन्यथा तिव्र आंदोलन! कृषि सहाय्यक संघटनेचे जिल्हा कृषि अधिक्षकांना निवेदन

वर्धा : कृषिसहायक संवर्गात विविध समस्या भेडसावत आहे, त्यामुळे कृषि सहायकांमध्ये तिव्र असंतोष असुन त्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्या याकरिता महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक जिल्हा संघटनेच्या वतीने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना निवेदनातून मागणी करण्यात आली आहे. निवेदनातुन वेगवेगळ्या १६ मागण्या सोडविण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे.

शासनाच्या विविध योजना कृषिसहायक वेळेनुसार गावात सहकार्य करून शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करण्याचे काम करत आहेत परंतु अनेक योजनांमध्ये शेतकरी नोंदणी करतांना शेतकर्यांकडे वेळेवर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे अडचणी निर्माण होतात तसेच काही ग्रामीण भागात गावात मोबाईल नेटवर्कच्या अडचणी येत असतात. मागील दिड वर्षापासून कोरोना संसर्गजन्य रोगपसरत असल्यामुळे मोठया प्रमाणात नोंदणी करण्यास अडचणी येतात याचा विचार करण्यात यावा.

कृषि सहायक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अंकुश लोकरे हे कृषिसेवक व कृषि सहायकांच्या अडचणी संदर्भात जि.अ.कृ.अ. यांच्या कार्यालयात हजर झाले असताना शासन मान्यता संघटनेच्या अध्यक्षाना अपमान जनक वागणुक देवुन वयक्तिकरित्या कारणे दाखवा नोटीस देण्यात आली शासन मान्य संघटनेच्या अध्यक्ष व पदअधिकाऱ्यांना आपल्या संवर्गाच्या समस्या, अडचणी मांडण्याचा अधिकार शासनाने दिलेला आहे.

त्या अधिकाराचा वापर करून कृषि सेवकांवरती होणाऱ्या अन्यायाविरूध्द चर्चा करून विनंती करण्याकरिता संघटनेच्या शिष्टमंडळासह हजर झाले असता त्यांना दिलेल्या अपमानजनक वागणुकीचा संघटना तिव्र शब्दात निषेद करत असुन भविष्यामध्ये सदर निवेदनामधील बाबीवर चर्चा करण्याकरिता लवकरात लवकर बैठक बोलवुन समस्या निकाली काढण्यात याव्या व झालेले गैरसमज दुर करण्यात यावे अन्यथा नाईलाजास्तव वर्धा जिल्हा कृषि सहायकसंघटनेकडुन तिव्र अंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असे निवेदनात म्हण्टले आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अंकुश लोकरे, उपाध्यक्ष मोईन शेख, सचिव नितेश कोठेकर, कार्याध्यक्ष राहुल देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here