ट्रॅव्हल्स अपघातात 15 वऱ्हाडी जखमी! तळेगाव-चांदणी शिवारातील घटना

खरांगणा-मोरांगणा : चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला उतरून ट्रॅव्हल्स झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात 15 वऱ्हाडी जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री 7 वाजताच्या सुमारास तळेगाव-चांदणी शिवारात घडली. वाहनचालक हा चांदुर रेल्वे तालुक्यांतर्गत तुरा साकोली या गावातून एमएच 40/एन-3746 क्रमांकाच्या 35 सिटर ट्रॅव्हल्समध्ये वऱ्हाडी घेऊन काजळी पेंढरी (ता.हिंगणा, जि.नागपूर) मार्गे वर्धेकडे भरधव जात होता.

दरम्यान तळेगाव-चांदणी नजिक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ट्रॅव्हल्स थेट रस्त्याखाली उतरुन ती झाडाला धडकली. या अपघातात 15 वऱ्हाडी जखमी झाले. अपघाताची माहिती खरांगणा पोलिस स्टेशनला मिळताच पोलिस उपनिरीक्षक श्याम सूर्यवंशी यांचेसह विठ्ठल केंद्रे, गजू डोंगरे, श्याम इनवाते, मारुती सिडाम यांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना उपचारार्थ रुग्णवाहिकेद्वारे वर्धा येथील रुग्णालयात दाखल केले. अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली. पुढील तपास पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here