क्षुल्लक वाद चिघळला ; चौघांनी युवकास बदडले

हिंगणघाट : घरासमोरुन सायकल घेवून जायचे नाही , असे म्हणत चौघांनी युवकास काठीने मारहाण करीत जखमी केले . माता मंदिर वॉर्ड परिसरात ही घटना घडली.

पोलीस सूत्रानुसार , रामदास वैद्य हे मुलगा उमेश सोबत दुचाकीवर जात असताना संकेत जामगडे याने तु या रस्त्याने सायकल चालवत जायचे नाही , असे म्हटले , उमेशने याबाबत विचारणा केली असता संकेत जामगडे, सूरज जामगडे, शिवा लोणकर, प्रतिक जामगे यांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्कयांनी तसेच दगडाने मारहाण केली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here