शेतालगत आढळले बिबटाची दोन पिले! वनविभागाची पिलांवर निगराणी

कारंजा : तालुक्यातील सेलगाव (उ) परिसरातील शेतकरी आपल्या शेतात आलेल्या माकडांना हाकलत असताना त्याला बिबट दिसला बिबट दिसताच शेतकर्याने गावाकडे धाव घेत याची माहिती परिसरातील नाहरीकांना दिली. नागरीकांनी बिबट पाहण्याकरीता घटनास्थळाकडे धाव घेतली असता तेथे बिबटाची दोन पिल खडकाच्या बाजूला दडून बसल्याची घटना उघडकीस आली.

या घटणेची माहिती वनविभाग देण्यात आली त्यानंतर वनविभागाचे अधिकारी पोहचून पाहणी केली असता गोट्याच्या गुफेत दोन पिल्लांना जन्म दिला असावं असं अंदाज व्यक्त केला. हे दोन पिल्ले 8 ते 10 दिवसाचे असल्याचे सांगण्यात आले. याठिकाणी वनरक्षक यांना गस्त घालण्यासाठी ठेवण्यात आले. अनेकांना शेतात जाणाऱ्या मार्ग उपस्थित राहून तिथे लोकांना जाणे येणे बंद करण्यात आले . या स्थळी 2 कॅमेरे लावण्यात आले आहे. आज रात्री बिबट आपल्या पिल्लं घेऊन जागा बदलवण्याची शक्यता आहे त्यासाठी या ठिकानावरून पिल्लांना बाहेर नेणार का यासाठी कॅमेरा लावण्यात आले आहे. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. गायनेर, डी. एल. खरबडे क्षेत्र सहाय्यक जुनापाणी, एन. वाय. परतेतकी, सी. एस. उईके वनरक्षक, बी. एस. डोबाले, ओंकार चौधरी या परिसरात गस्त घालण्यात येत आहे त्या ठिकणी वन कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here