बोलेरोची दुचाकीला धडक! चालक गंभीर; हळदगाव शिवारातील घटना

समुद्रपूर : बोलेरोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार 23 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर चंद्रपूरकडून-नागपूरकडे जाणा-या रोडवर हळदगाव शिवारात घडली. बोलेरो वाहन क्र. एमएच 31 इके 0619 ने गोविंदपूर ते हळदगावकडे विरूध्द दिशेने जाणा-या दुचाकी क्रमांक एमएच 32 झेड 0335 या वाहनाला जबर धडक दिली. यात दुचाकीचालक अंकुश ढाकणे, (वय 49) रा. रामनगर यांच्या डोक्याला, पायाला गंभीर मार लागून जखमी झाला.

सदरची माहीती प्राप्त होताच महामार्ग पोलिस केंद्र जाम येथील सपोउपनि स्नेहल राऊत व पोलिस अमलदार पोहवा किशोर येळणे, नरेंद्र दिघडे, गौरव खरवडे, देवेंद्र पुरी, विनोद थाटे, दिपक जाधव, मपोना ज्योती राऊत तत्काळ घटनास्थळी पोहोचले. दुचाकी चालक अंकुश ढाकणे (वय 49) रा मनगर यांस रूग्णवाहिकामधून ग्रामीण रूग्णालय समुद्रपूर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. पुढील तपास समुद्रपूर पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here