लॉजमध्ये नेऊन २४ वर्षीय युवकाचा ४० वर्षीय महिलेवर अत्याचार! बदनामी करण्याची दिली धमकी

वर्धा : जिनींग कंपनीत काम करणाऱ्या महिलेला शहरातील एका लॉजमध्ये नेऊन २४ वर्षीय युवकाने बळजबरी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने आर्वी शहरात एकच खळबळ उडाली. पीडितेला गर्भधारणा झाल्याने हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक केल्याची माहिती दिली. हरिष उत्तम किंदरणे रा. आंबेडकर वॉर्ड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पीडिता आणि आरोपी हे दोघेही आर्वी येथील एका जिनींगमध्ये कामावर होते. दोघांचीही एकमेकाशी ओळख झाली. पीडिता कामावर गेली असता आरोपी हरिषने तुला फिरायला नेतो, असे म्हणून दुचाकीवर बसवून शहरातील एका लॉजमध्ये नेले. तेथे तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच कॅनलमध्ये नेवून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. पीडिता ही आठ महिन्याची गर्भवती राहिल्याने तिला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले असता हा प्रकार उघडकीस आला. अखेर पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपी हरिषविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बदनामी करण्याची दिली धमकी

पीडितेवर अत्याचार करुन तिला आरोपी हरिष याने समाजात बदनामी करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पीडितेने पोलिसांत तक्रार दिली नव्हती. मात्र, पीडितेला गर्भधारणा झाल्याने हा प्रकार उजेडात आला आणि पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here