दोन गटात राडा! दोघांवर चाकुहल्ला

वर्धा : दारु पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याने युवकास शिवीगाळ करीत चाकूने सपासप वार करीत जखमी केले. पुलगाव येथील सुभाषनगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली. शुभम अरुण वाढवे हा दुचकीत पेट्रोल भरुन घरी जात असताना साहील हिवसे, रितीक श्रीवास हे त्याला रस्त्यात भेटले.

दोघांनी शुभमला दारु पिण्यासाठी पैसे मागितले. शुभमने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी वाद करीत शुभमच्या पोटावर चाकूने वार केले. तर रितीक श्रीवासने दिलेल्या तक्रारीनुसार, तो साहिलसोबत बोलत असताना शुभम वाढवे, राकेश जांभुळकर हे दोघे आले त्यांनी शिवीगाळ का करता असे म्हणून वाद केला. रितीक हा समजाविण्यास गेला असता चाकूने वार केले. दरम्यान पोलीसात तक्रार का दिली या कारणातून रितीक श्रीवास याची दुचाकी शुभम वाढवे, रितीक किटे, चेतन मेश्राम यांनी पेटविली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here