मोदी सरकार अखेर झुकलं! वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं. पंतप्रधान कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९.०० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरूवात झाली. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रानं विरोधकांचा विरोध डावलून संसदेत बळाच्या जोरावर संमत केलेल्या कृषी कायद्यांच्या फायद्यांचा फायदा पुन्हा एकदा वाचून दाखवले.

सोबतच, हे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. या तपस्येत कमी राहिली असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी यावेळी केलीय. या महिन्याअखेरीस सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे माघारी घेण्याची संवैधानिक प्रक्रिया सुरू केली जाईल, असं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here