10 लाख घेऊन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण! हिंदी विश्‍व विद्यालयातील घटना

वर्धा : ओळखीच्या व्दियार्थिनीसोबत प्रेमसंबंध प्रस्तापित करून तिच्याकडून 10 लाख रुपये घेऊन तिचे अनेक वर्षांपासून लैंगिक शोषण केले. त्यानंतर स्वतःच्या बचावाकरिता पीडित विद्यार्थिनी पत्नी असल्याचे विवाहाचे खोटे कागदपत्रे तयार केले. ही घटना दिल्ली व वर्धा येथील महात्मा गांधी हिंदी विश्‍वविद्यालयातून उजेडात आली.

नागपूर भिलगाव कामठी येथील फिर्यादी विद्यार्थिनी 16 वर्षांची असताना 2013 मध्ये दिल्ली येथे शाळेत आरोपी केशवकुमार प्रदीपकुमार यादव याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध झाल्याने त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले. फिर्यादी व आरोपी हे दोघेही 2018 पर्यंत दिल्ली येथे राहत होते. त्यानंतर 2019 मध्ये वर्धा येथील महात्मा गांधी विश्‍वविद्यालयात शिक्षणाकरिता आले, 2021 पर्यंत शिक्षण घेतले. शिक्षण घेत असतानासुद्धा आरोपीने फिर्यादीस फोटो दाखवून धमकी देत वेळोवेळी 10 लाख रुपये घेऊन शारीरिक संबंध केले. तसेच स्वतःच्या बचावाकरिता दिल्ली येथे लग्न केल्याचे व फिर्यादी ही पत्नी असल्याचे बनावट कागदपत्र तयार केले.

एक वर्षापासून फिर्यादी ही नागपूर येथे राहत आहे. या प्रकरणी फिर्यादी युवतीने वर्धा येथील न्यायादंडाधिका-याकडे अर्ज केल्याने न्यायालयाने आरोपीवर गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी केशवकुमार प्रदीपकुमार यादव (वय 28) रा. बिहार याच्याविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here