धाम नदीपात्र परिसरात स्वच्छता अभियान! रोट्रँक क्लब गांधी सिटी वर्धाचा उपक्रम

पवनार : येथील रोट्रँक क्लब गांधी सिटी वर्धा या सामाजिक संस्थेच्या वतीने धाम नदीपात्र परिसरात स्वच्छता अभियान राबवीण्यात आले. यावेळी परिसरातील कचरा व प्लास्टिक गोळा करुन यूवकांनी स्वच्छता मोहिम राबविली.

लॉकडाउन काही प्रमाणात शिथील झाल्याने आता पवनार धाम नदीपरिसरात पर्यटकांची गर्दी वाढत आहे या ठिकाणी अनेक पर्यटक येतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा आणि प्लास्टिक या परिसरात फेकतात हे लक्षात घेत शहरातील रोट्रँक क्लब गांधी सिटी या संस्थेने पुढाकार घेत नदीपरिसर स्वच्छ करण्याचा निर्णय घेत परिसराची सफाई केली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here