उच्चशिक्षित युवतीची आत्महत्या! एकच खळबळ उडाली

सेवाग्राम : पुण्यात उच्च शिक्षण घेत असलेल्या युवतीने आपल्या गावातील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बोंडसुला येथे रविवारी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मेघा धोंडबाजी गावंडे (२६) रा. बोंडसुला, असे मृत युवतीचे नाव आहे. ती पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून लॉकडाऊनमुळे गावीच आली होती. सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास ती करीत होते. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी आई शेतात गेली तर वडील आणि भाऊ हमदापूर येथे दुकान असल्याने निघून गेले होते. त्यामुळे घरी कुणीही नसतांना मेघाने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी भाऊ घरी परतल्यानंतर त्याला मेघा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यामुळे त्याने लागलीच आई-वडीलांना माहिती देऊन दहेगाव पोलिसांना कळविले. या घटनेने गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here