

संजय धोंगडे
सेलू : गेल्या पाच महिन्यापासून महावितरण कंपनीला ग्राहकाने वारंवार विनंती अर्जानुसार पूर्व सुचित केल्यानंतर सुद्धा घरगुती वापराचे बिलं न येता चक्क व्यवसायाचे बिल येतअसल्यामुळे ग्राहकाला आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
सेलू येथील गजानन नगरी येथे स्वतःच्या प्लॉटवर मनोज केशवराव बोकडे यांनी स्वतःचे घराचे बांधकाम करते वेळेस महावितरण कंपनी कडे सप्टेंबर २०१९ मध्ये मिटर देण्यासंबंधी अर्ज कार्यालयाकडे सादर केला होता, एप्रिल २०२० महिन्यामध्ये त्यांचे घराचे संपूर्ण बांधकाम पूर्ण झाले, तोपर्यंत त्यांना व्यावसायिक बिल येत होते, मे २०१९ च्या पहिल्याच आठवड्यात त्यांनी महावितरण कंपनीकडे बांधकाम पुर्ण झालेल्या संबंधीचा अर्ज करून यानंतर पुढील येणारे बिल हे घरगुती वापराचे दराप्रमाणे येण्याकरिता अर्ज केला होता, गेल्या पाच महिन्यापासून ग्राहक मनोज केशवराव बोकडे हे महावितरण कंपनीचे कार्यालयात सुधारित बिल देण्यासंबंधी कित्येकदा चक्र मारून सुद्धा महावितरण कंपनीकडून कुठलीच दखल न घेतल्यामुळे ग्राहकाला मानसिक, आर्थिक, शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे,
त्या ग्राहकाचा सुधारित बिल करून देण्यासंदर्भातील अर्ज सेलू कार्यालयात आला असून ही प्रोसेस ऑनलाइन करावी लागत असल्याने वेळ लागत आहे, तोपर्यंतचे येणारे वाढीव बिल ग्राहकाला भरावाच लागेल.
आशित सहारे,
कनिष्ठ अभियंता महावितरण कार्यालय सेलू
मी रोज मजुरी करणारा युवक असून गेल्या पाच महिन्यापासून मला महावितरण कंपनीकडून विनाकारण नाहक त्रास होत असल्याने त्रस्त झालो आहे, तसेच वाढीव बिल ७५०० रुपये आल्याने एवढी मोठी रक्कम कशी भरावी हा मोठा विचार माझ्या परिवारावर पडला आहे.
मनोज बोकडे,
ग्राहक, गजानन नगरी सेलू