जुगाऱ्यांना ठोकल्या बेड्या! ४१ हजारांचा मुद्देमाल केला जप्त

वर्धा : तळेगाव परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापा मारुन तब्बल ७ जुगाऱ्यांना अटक करुन ४१ हजार रुपयांची रोख रक्‍कम जप्त केली. विशेष म्हणजे एका अल्पवयीन बालकालाही ताब्यात घेण्यात आले.

तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काकडधरा परिसरात जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी कारवाई करीत जुगार अड्यावर छापा मारला असता अनिल भास्कर उंद्रे धनवानसिंग गुरुदेवसिंग बावरी, शाहरुख ईसराइल शेख, मनोहर ज्ञानेश्वर वानखेडे, जुगनर्सिंग बादलसिंग बावरी, खुशाल बबन डोंगरे यांना अटक केली. तसेच एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. पोलिसांनी ताश पत्त्यांसह जुगारच्या डावावर खेळणारे ४१ हजार ८८२ रुपये रोख तसेच चार मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here