वाहनाच्या धडकेत व्यक्ती जखमी! पोलिसांत तक्रार दाखल

0
79

समुद्रपूर : भरधाव वाहनाने बैलबंडीला धडक दिल्याने बैलबंडीचालकास जखमी केले. तसेच बैलालाही मार लागला. चाकूर फाट्याजवळ हा अपघात झाला.

बैलबंडीचालक हा कानकाटी शिवारातून शेतातून चाकूर फाट्याकडे जात असताना मागाहून भरधाव आलेल्या एम. एच ४९ बी. १७३४ क्रमांकाच्या वाहनाने बैलबंडीला जबर धडक दिली. यात बैलबंडीचालक गंभीर जखमी झाला असून बैलांनाही जखमा झाल्या. याप्रकरणी समुद्रपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here