
वर्धा : सावंगी व समुद्रपूर ठाण्यातंर्गत घडलेल्या दोन वेगवेगळया ठिकाणावरील अपघातात दोघांचा मृत्यू झाला. एकाचा मृत्यू अँम्ब्लून्सच्या धडकेत तर दुसरा ट्रॅक्टरच्या फे-यात आल्याने या दुर्देवी घटना घडल्या.
प्राप्त माहितीनुसार सावंगी वार्ड क्र. ६ येथील रहिवासी सचिन गजानन साटोणे (वय ४१)हे त्यांच्या एम.एच ३२ एक्यू १२२० क्रमाकांच्या दुचाकीने सावंगी (मेघे) कडे जात होते. रविवारी रात्री ७ वाजता दरम्यान सावंगी टी पॉईंट चोौरस्त्यावर समोरून भरधाव येणा-या एमएच ३१ सीक्यू ४८१९ अँम्बुलन्सने दुचाकीला धडक दिली. अपघात इतका गंभीर होता की, सचिन दुचाकीसह दूर जाऊन पडला. यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाली.
परिसरातील नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्यांना सावंगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघातानंतर अँम्बुलन्स चालक वाहना सह फरार झाला. याप्रकरणी सावंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहेत.