नागपुरात तुरीने गाठळा सात हजाराचा पल्ला

वर्धा : विदर्भात सर्बंदूर देशांतर्गत मागणी वाढल्याने तुरीच्या दरात सुधारणा झाली आहे. सोमवारी (ता.८) अमरावती जिल्ह्यातील मोशी बाजार समितीत सातहजार पाचशे रुपये क्विंटलने तुरीचे व्यवहार झाले. नागपूरच्या कळमना बाजार समितीत देखोल तुराळा ७००० रुपये क्विंटल दर मिळाला. तुरीच्या दरातोल तेजी यापुढे देखोळ कायम राहण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने तूर विकावी, असा सल्ला जाणकारांकडून दिला जात आहे. प्रक्रिया उद्योगाकडून तुरीला वाढती मागणी आहे. परिणामी तुरीने हमीभावाचा टप्पा ओलांडला आहे.

कळमना बाजार समितीत तुरीची 3 हजार क्विंटलची आवक झाली. ६००० ते ७००० रुपये या दराने तुरीच व्यवहार होत आहेत. अमरावतो बाजार समितीत ७३०० रुपयांचा, मोर्शींत ७५०० रुपयांचा दर मिळाला. आंबिया बहाराचा हंगाम संपल्यानंतर आता मृग बहारातील संत्री बाजारात येत आहेत. आता संत्रा दरात तेजी अनुभवली जात आहे. संत्र्याचे व्यवहार ३७०० ते ४५०० रुपये क्विंटलने होत आहेत. बाजारातील संत्र्यांची आवक १८० क्विंटलची आहे. बाजारात मोसंबीची देखील आवक होत आहे. त्याचे दर ३५०० ते ३८०० स्पये क्विंटलवर पोचले आहेत. बाजारात मोसंबोला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात २५०० ते. ३०००रुपये दर होता. मोसंबीची आवक १००० क्विंटलची होती. त्यानंतरच्या काळात मोसंबोचे दर ३००० ते ३८०० रुपयांवर पोचले. आता ३५०० ते ३८०० रुपयांवर मोसंबी दर स्थिर आहेत. बाजारात केळीची आवक २२ किविंटलच्या घरात आहे. केळीला किमान ४५० तर कमाल ५५० रुपये दर मिळत आहे. द्राक्षाचे व्यवहार ते. ६००० रुपये क्विंटलने होत असून आवक ३९९ क्विंटलची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here