वीटभट्टीच्या पाण्यासाठी नाल्यात खोदण्यात आलेल्या खड्ड्यात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा करुण अंत! वीटभट्टी चालकावर गुन्हा दाखल

हिंगणा : वीटभट्टीच्या पाण्यासाठी नाल्यात खोदण्यात आलेल्या खड्ड्यात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा करुण अंत झाला. आरुषी नामदेव राऊत (११) व अभिषेक नामदेव राऊत (९) अशी मृत मुलांची नावे आहे. हिंगणा तालुक्यातील (जि.नागपूर) येथे दुर्दैवी घटना घडली.

याप्रकरणी ग्रामस्थांचा रोष लक्षात घेता हिंगणा पोलिसांनी वीटभट्टी चालक सुरेश मलिये व स्वदीप मलिये (रा. सावंगी देवळी) यांच्यावर भादंविच्या कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी दुुपारी या दोन्ही मुलांचे मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here