मोपेडला चारचाकीची धडक! अपघातातील जखमीचा मृत्यू

वर्धा : मोपेडला चारचाकी वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या चालकाचा उपचारादरम्यान बुधवार 22 डिसेंबर रोजी सेवाग्राम रुग्णालयात मृत्यू झाला. तर चालकाच्या जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. यातील मृत नरेश मारोतराव सिरसकार (वय 52) रा. चिंचोली ता. कळंब हे त्यांच्या मोपेड गाडी क्रमांक एम. एच. 32 टी. 3243 ने चिंचोलीवरून हिंगणगाट येथे अंदोरी ते आंजीमार्गे जात होते.

दरम्यान, आंजी चौफुलीवर देवळीकडून अंदोरीकडे येणा-या कार क्र. एमएच. 43 आर 6540 ने भरधाव वेगाने जोराची धडक दिली. या अपघातात पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले होते. डोक्याला व पायाला गंभीर मार लागल्याने त्यांना उपाचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात भरती करण्यात आले होते. या प्रकरणी एम. एच. 43 आर. 6540 च्या चालकाविरुद्ध देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ‘पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here