शेतशिवारातून कापूस चोरणाऱ्यास ठोकल्या बेड्या ! वडनेर पोलिसांनी केली कारवाई

वर्धा : दारूच्या आहारी गेलेल्या दोघांनी आपले व्यसन पूर्ण करण्याकरिता गेल्या काही दिवसांपासून वडनेर शिवारात कापूस चोरीचे सत्र राबविले होते. अखेर वडनेर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून आता या परिसरात कापूस चोरीच्या इतरही घटनांचा उलगडा होणार आहे. नरेश सिडाप व यादव रामगडे दोघेही रा. दारोडा, असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे दोघेही मोलमजुरी सोबतच दारूविक्री पुरवठा करण्याचेही काम करतात. 3 फेब्रुवारीला दारोडा येथील शेतकरी संदीप बबन झाडे यांच्या शेतातून दोन पोते कापूस भरून नेण्याच्या तयारीत असताना दोघांनाही सकाळी सहा वाजता रंगेहात पकडले. दोघांनाही गावात आणून वडनेर पोलिसांना याची माहिती दिली.
वडनेर पोलीस स्टेशनचे अजय रिठे, रंजीत फाले, अजय वानखेडे यांनी दारोडा गाठून नरेश सिंडाम व यादव रामगडे यांना अटक केली. पुढील तपास ठाणेदार राजेंद्र शेटे यांच्या
मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here