नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत केदारांनी विरोधकांचा उडवला धुव्वा! इतिहास घडवत सर्व जागेवर विजय

नागपूर : नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूरच्या (कळमना मार्केट) काल लागलेल्या निकालात महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या सहकार पॅनलने इतिहास घडवत सर्व १८ ही जागेवर धडाक्यात विजय मिळवत विरोधकांचा ‘निक्काल’ लावला आहे म्हणजेच ‘निक्काल’ लावला.

सुनील केदार यांच्या सहकार पॅनलचे सेवा सहकारी संस्था मतदार संघातून विजय चौधरी, वसंतराव लांडगे, प्रकाश नागपुरे, अजय राऊत, बेनिराम राऊत, अहमदभाई शेख, बाबाराव शिंदे, रवीचंद्राबाई नांदूरकर, अंजली शिंदे, हरिभाऊ गाडबैल, अशोक सोनवाने तसेच ग्रामपंचायत मतदारसंघातील संजय कुंटे, दीपक राऊत, महेश चोखंद्रे, नारायण कापसे तसेच व्यापारी मतदारसंघातील प्रकाश वाधवाणी, अतुल सेनाड व हमाल मतदारसंघातून किशोर पलांदूरकर यांनी घवघवीत विजय मिळविला आहे. भारतीय जनता पक्षाला या निवडणूकीत मोठा पराभव पत्करावा लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here