विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने तिघांच्या मृत्यू! गावात पसरली शोककळा; मंदिरावरचा झेंडा बदलविताना घडली घटना

वर्धा : रक्षाबंधनाचा सन असल्याने देवीच्या मंदिरावरील झेंडा बदलविण्याकरिता गेलेल्या तिघांना झेंड्यासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी खांब असंतूलीत होवून विद्युत तारांवर पडल्याने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. ही घटना शहरालगतच्या पिपरी (मेघे) येथे बुधवार (ता. ३०) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.

अशोक विठोबा सावरकर (५६), सुरेश भाष्कर झिले (३५) व अशोक उर्फ बाळू नारायणसिंग शेर (६०) सर्व राहणार पिपरी (मेघे) असे मृतांची नावे आहे. वर्धा ते आर्वी मार्गावर पिपरी (मेघे) येथे नव्यानेच देवीच्या मंदिराची उभारणी करण्यात आली असून या मंदिरात नेहमीच भाविकांची वर्दळ असते. आज रक्षाबंधनानिमित्त या मंदिरावर लोखंडी पाईपमध्ये असलेला झेंडा बदलविण्याकरिता हे तिघेही मंदिरावर चढले होते.

मंदिरावरील झेंडा बदलविताना लोखंडी पाईप असंतुलीत होऊन मंदिरालगत गेलेल्या विद्युत वाहिन्यावर पडला. त्यामुळे पाईपमध्ये विद्युत प्रवाह संचारल्याने तिघांना जबर झकटा बसून तिघेही मंदिराच्या शेडवर फेकल्या गेले. यात तिघांना गंभीर मार लागल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांना उपचाराकरिता रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here