ऑनलाइन पद्धतीने २० हजार रुपयांचा घातला गडा! अज्ञात चोरसट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : शिवार्पणनगरातील नागरिकाची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याने १९ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेदरम्यान शिवार्पणनगर येथील सतीश दत्तात्रय एलचटवार यांच्या मोबाइलवर मेसेज पाठविला. त्या मेसेजमध्ये तुमचे एसबीआयचे खाते असून, ते ब्लॉक करण्यात येणार आहे. तुम्ही पॅनकार्ड अपडेट करा व खालील दिलेल्या लिंकवर चेक करा, असे नमूद होते.

सतीश एलचटवार यांनी लिंक ओपन करून पाहली असता त्यांना ओटीपी विचारण्यात आला. त्यांना तो ओटीपी टाकला असता त्यांच्या अकाउंटमधील २० हजार रुपये कपात झाले. दरम्यान, चोरट्याने ऑनलाइन फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी एलचटवार यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात चोरसट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here