
राहुल काशीकर
पवनार : सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातला आहे या पार्शवभूमीवर प्रशासनाकडून शहरी आणि ग्रामीण भागातील मास न वापरणाऱ्या नागरिकाकडून दंड आकरण्यात येत आहे. मात्र पवनारात एका पोलिस शिपायाकडून जाणीवपुर्वक एका पाणटपरी चालकाला टार्गेट करून मासचा वापर करीत असतानाही त्याच्याकडून वारंवार २०० रुपयाचा दंड आकरण्यात येत असल्याची बाब सामोर आली आहे. दांडाच्या नावर अरेवारी करून वसुली करण्यात येत असल्याची चर्चा सध्या परिसरात सुरु आहे.
कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी प्रशासनाकडून मास न वापरणे, सोशल डिस्टंटिंगचे नियम न पाळणाऱ्याविरुद्ध कारवाई सध्या शहरात आणि ग्रामीण भागातील सुरु आहे. मात्र मास वापरले आणि नियमाचे पालन केले तरी दंड देण्याचा प्रकार सध्या पोलीसाकडून सुरु आहे. विशेष म्हणजे ही कारवाई टार्गेट करून एकाच पानटपरी व्यवसायिकरिता असल्याचे दिसून येते आहे.
येथील रोहन पाटणकर मास लावून असो या नियमाचे पालन करून पानटपरी चालवीत असो, त्याच्या कडून दंड हा ठरलेलाच आहे. पाहिलेच कोरोनामुळे अनेकाचे रोजगार गेले आहेत, सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम नाही, त्यातच कुटुंब कसे चालवायचे असा प्रश्न सर्वांन सोमोर उभा आहे. यातच आता पुन्हा कोरोच्या वाढत्या रुग्णसंख्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र दहशत निर्माण झाली आहे.
प्रशासनाने दिलेल्या वेळेत सर्व व्यवसायिक आपले दुकाने आणि पानटपरी चालवीत आहे. नियमानुसार तोंडाला मास आणि सोशल डिस्टंटिंगचे नियम पाळून दिवसभर कसे बसे 300 ते 400 रुपये कामावीत आहे, त्यातच आता पोलीस करिमचार्याकडून अरेरावी करून पानटपरी व्यवसायिकाला टार्गेट करून त्याच्या कडून २०० रुपयाचा दंड आकरण्यात येत आहे. असे एकच वेळा नाही तर एकालच टार्गेट करून दंड देण्यात येत असल्याचा प्रकार आज तिसरी वेळा घडला आहे. या प्रकारामुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधान आलेले आहे.