

वर्धा : नजीकच्या खरांगणा (गोडे) येथील रहिवासी असळेल्या एका 16 वर्षीय मुलीचा थेट राजस्थान राज्यातील कोटा येथे नेत विवाह लावून देण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या प्रकरणी सेवाग्राम पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. पीडित मुलीला तिच्या वडिलांनी राजस्थान राज्यातील कोटा येथे नेले. तेथे मुलीच्या वडिलांनी एका पंडिताला हाताशी धरून तिचा विवाह लावून दिला.
या विवाह सोहळ्याला वधू व वर पक्षाकडील काही मोजक्या व्यक्तींची उपस्थिती होती. हा विवाह सोहळा पार पडल्यावर पीडितेचे वडील खरांगणा (गोडे) येथे परतले. पण त्यांनी याबाबतची कुठेही बाच्छता केलो नाही. अवघ्या 16 वर्षांची पोडिता ही गावात दिसत नसल्याने गावात उलट-सुटल चर्चेला उधाण आले. अशातच स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायतीच्या महिला अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता संबंधित मुलीचा बालविवाह लावून देण्यात आल्याची बाब पुढे आलो. त्यानंतर तातडीने सेवाग्राम पोलिस तसेच महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. चौकशोअंती याप्रकरणी मुलीचे वडील, अल्पवयीन मुलीशी विवाह करणारा व्यक्ती, विवाह लावून देणारा पंडित तसेच लग्नसोहळ्याळा उपस्थित व्यक्तींबर सेवाग्राम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सेवाग्राम पोलिस करीत आहेत.