विषप्राशन करून दोघांची आत्महत्या

वर्धा : विषप्राशन करून हिंगणघाट तालुक्यातील दोघांनी आत्महत्या केली. नांदगाव येथील संतोष ज्ञानेश्‍वर शेळके याने २० रोजी विषप्राशन केले होते. त्याच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू होता. तसेच सातेफळ येथील शेषराव तानबाजी तिजारे यानेही २२ रोजी विषप्राशन केले होते. दोघांवरही सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता, २३ रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांत नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here