धावत्या ट्रॅक्टरने घेतला पेट! चालक गंभीर जखमी

अल्लीपूर : रस्त्याने धावत असलेल्या ट्रॅक्‍टरने अचानक पेट घेतल्याने ट्रॅक्‍टर अनियंत्रित होऊन पलटी झाला. यामध्ये चालक गंभीर जखमी झाल्याची घटना अल्लीपूर ते दरणे (टाकळी) मार्गावर दुपारच्या सुमारास घडली. अल्लीपूर वरून दरणे (टाकळी)कडे जाणाऱ्या ट्रॅक्‍टरचे अचानक पेट घेतल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅक्टर पलटी होऊन चालक गजानन वगारहांडे रा. आंजी हा गंभीर जखमी झाला. त्याल उपचारांकरिता अल्लीपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांकरिता सेवाग्राम रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच अल्लीपूरचे सरपंच नितीन चंदनखेडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अल्लीपूर पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास ठाणेदार सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here