नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

वर्धा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सततधार पाऊस सुरु असल्यामुळे काही प्रकल्प 100 टक्के तर काही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे जलाशयातील पाणी दरवाजे, सांडव्यावरुन सोडण्यात आले आहे. नदी काठावरील गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन, प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मदन उन्नई, पांजरा बोथली लघु प्रकल्प, पोथरा प्रकल्प, आंजी बोरखेडी लघु प्रकल्प, कवाडी, पारगोठाण, रोठा-1, सावंगी लघु प्रकल्प, धाम प्रकल्प 100 टक्के तर 85.31 टक्के, पंचधारा 83.66 टक्के भरलेले आहे. तसेच अप्पर वर्धा प्रकल्प 78.13 टक्के भरला असून 13 गेट 120 सेमी., नांद प्रकल्प 69.15 टक्के 7 गेट 100 सेमीने, बोर प्रकल्प 71.64 टक्के 9 गेट, लोअर वर्धा 68 टक्के 31 गेट, वडगाव प्रकल्प 72.35 टक्के भरला असून 19 गेट उघडण्यात आले आहे. या सर्व प्रकल्पातील पाणी नदी पात्रात सोडण्यात येत असल्यामुळे नदी काठावरील गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here