
वर्धा : आर्वी तालुक्यातील धानोडी (बहाद्दरपूर) येथील निम्न वर्धा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दरवाजे १.३ मीटरने उघडण्यात आले. यामधून आज सकाळी ९.०० वाजता एकूण विसर्ग ३४६६ क्युमेंक पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्यात आले.
या सुरु असलेल्या विसर्गामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.


















































