
हिंगणघाट : अज्ञात वाहनाने ऑटोला दिलेल्या धडकेत ऑटो चालकासह 13 मजूर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी वणा नदी पुलावर घडला. माहितीनुसार नागपूर -हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 च्या वणा नदीच्या पुलावर शेतात मजूर घेऊन जात असलेल्या ऑटोला अज्ञात वाहनाने धडक दिली.
यामध्ये ऑटोचालकासह 13 जण गंभीररित्या जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गिरधर पेंदोर, पोलिस कर्मचारी नितीन राजपुत, अझहर खान, प्रदिप राठोड घटनास्थळी पोहचले. जखमींना त्वरीत उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले. काही मजुरांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सेवाग्राम येथे हलविण्यात आले. जखमींचे नावे माहिती होऊ शकली नाही. पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.