विजेच्या लंपडावामुळे घोराड परीसरातील नागरिकांची वाढली डोकेदुखी! वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त

संजय धोंगडे

सेलू : तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका अनेकांना बसत असून लोक त्रस्त झाले आहे घोराड परीसरात विजेचा लंपडाव सुरूच असून ही बाब नागरीकांची डोकेदुखी ठरू लागली आहे काही कारण नसताना दिवसा तसेच रात्रीला वीज गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे याबाबत संबधीताना विचारणा केली असता समाधान कारक उत्तर मिळत नाही तर कधी सबस्टेशनचा भ्रमणध्वनी क्रमांक बंद करून ठेवण्यात कर्मचारी धन्यता मानत अाहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सर्रास सुरू असून यंत्रेणेतील दोष दूर करण्यासाठी पावले उचलली जात नाही नागरिक कमालीचे त्रस्त झाले असताना संबधीत अधीकारयांकडुन दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी याबाबत कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न विचारला जात आहे यापूर्वी असा प्रकार कधी पाहायला मिळत नव्हता वारा पाऊस पडला तरच वीजपुरवठा खंडित होत होता आता दिवसातून कितीतरी वेळा विजपुरवठा वारंवार खंडीत होतो याचा फटका छोटे व्यवसायीक तथा शेतकर्‍यांना बसत आहे. पुढे रब्बीचा हंगाम आहे असेच सुरू राहील तर ओलीत कसे करणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक ठिकाणी वेळकाढूपणा कारणीभुत असल्याची टीका केली जात आहे. कामे व्यवस्थित नसल्याने अनेक ठिकाणी तारा लोंबकळत पडल्या चे चित्र पाहायला मिळते कधी कोणती समस्या निर्माण झाल्यास ग्राहकांच्या तक्रारीचे निरसन होत नाही दोन दोन दिवस प्रतिक्षा करावी लागते विजवितरणचे अशा या कारभारामुळे नागरिकांत कमालीचा अंसतोष निर्माण होत आहे.
वरिष्ठांनी याकडे लक्ष वेधून त्वरीत उपाययोजना करावी व यास जबाबदार असणारयावर योग्य कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here