महागड्या कारमधून जप्त केला १७२ किलो सुगंधित तंबाखू! गुटखा विक्रेत्यास बेड्या

वर्धा : महागड्या कारमध्ये लपवून ठेवलेला १७२ किलो २०० ग्राम प्रतिबंधित सुगंधित तंबाखू साठा पुलगाव पोलिसांनी जप्त केला. कारसह पोलिसांनी ८ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीस अटक केली. ही कारवाई सिंधी कॉलनी परिसरात करण्यात आली. जितेश बनसीलाल गलानी असे अटक आरोपीचे नाव आहे.

जितेश गलानी याचा मागील अनेक वर्षापासून गुटखा, पान मटेरियलचा व्यवसाय आहे. पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी जात तपासणी केली असता घराबाहेर उभी असलेल्या एम.एच.१५ एफएफ, ४०४५ क्रमांकाच्या महागड्या कारची पाहणी केली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू साठा आढळून आला. पोलिसांनी जितेश गिलानी यास अटक करुन गुटखा जप्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here