अरे कोणी तरी आवरारे….या मोकाट जनावरांना! पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आणि कोंडवाडा नाहीसा केल्यांने झाली अडचण

मोहन सुरकर

सिंदी (रेल्वे) : शहरात सर्वत्र मोकाट फिरणाऱ्या जनावरानी पुर्ता उच्छांद मांडला असुन यांच्यामुळे सिंदीकरांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेच्या निष्काळजीपणामुळे कोणीतरी आवरारे…….बावा या मोकाट जनावरांना…..अस म्हणन्याची वेळ सिंदीवासीयांवर आली आहे.

शहरात मोकाट जनावरांची संख्या लक्षणीय वाढली असुन अनेक गोपालक दररोज दुध तर काढतात मात्र दिवसभर आपली ही जनावरे शहरात मस्त मोकाट सोडुन देतात ही जनावरे दिवसभर शहरातील खुल्या घरात घुसून नासधुस करतात ऐवढेच नाही तर शहरालगतच्या शेतात घुसुन शेत पीकाची नासधुस करतात या मोकाट जनावरांच्या त्रासामुळे शेतकरी वैतागले आहेत
याशिवाय ही जनावरे शहरातील प्रमुख रहदारीच्या रस्त्यावर मधोमध ठाण मांडुन बसतात परीनामता वाहन घेऊन शहरात येणार्‍या जाणार्‍याना दररोज अडचनीचा सामना करावा लागतो. याबाबत तक्रार कोणाला करावी आणि कोण यांचा बदोबस्त करणार असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

सिंदी रेल्वे शहर हे कृषी प्रधान शहर असुन शहरात प्रमुख व्यवसाय शेती आहे परिणामता शहरात गुरेढोरे पाळणार्‍याची संख्या मोठी आहे. यामुळे शहरात गाई, म्हशी, बकर्या आणि बैल वासरांची संख्या मोठी आहे. मात्र यातील काही गुरे पाळणार्‍यानी नविनच प्रकार सुरू केला रात्री आपल्या गोठ्यात घरी बांधलेली जनावरे सकाळी दुध काढले की शहरात हकलुन देतात आणि रात्री पुन्हा घरी आणुन बांधतात. अशा जनावरांची संख्या अगोदर कमी होती तेव्हा हा त्रास तेवढा नव्हता आज मात्र ही संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.

विशेष म्हणजे अगोदर शहरात इंग्रज काळापासुन “कांजी हाऊस” (कोंडवाडा) होता तेव्हा अशा त्रास देणार्‍या मोकाट जनावरांना पकडुन कोंडवाड्यात डांबले जायचे. ही जनावरे सोडविण्यासाठी जनावरांच्या मालकाला आर्थिक दंड पडायचा यामुळे हा जनावराचा मालक आपली जनावरे पुन्हा नासधुस किवा त्रास देणार नाही याची काळजी घ्यायचा मात्र पालिकेने हा कोंडवाडा नाहीशा केल्याने अडचन निर्माण झाली आहे. पालिका प्रशासनाने या समस्येकडे ताबडतोब लक्ष देऊन या सिंदीकरांसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या मोकाट जनवरांचा बदोबस्त करावा आणि यांच्या मालकांना समज द्यावा अथवा दंडात्मक कारवाई करावी अशी मांगणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here