सिंदीत कडकडीत बंद! कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला प्रतिसाद

मोहन सुरकार

सिंदी (रेल्वे) : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्या विरोधात शहरात मंगळवारी (ता. ८) स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला.

शहरात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी बाजारपेठ बंद करून केंद्र सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष वसंता सिरसे, शिवसेना शहर प्रमुख मंगेश माहूरे, शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश डफ, विशाल विविध सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अशोक कलोडे, नगर परिषद काँग्रेसचे गटनेते आशिष देवतळे, नगरसेवक विलास तळवेकर, रमेश उईके, संचालक सुधाकरराव खेडकर, अशोक कलोडे गुरुजी, बाबाराव सोनटक्के,रामदास झिलपे, मुन्नाजी शुक्ला, ए.सी. कलोडे,अफजल बेरा, अरुण बोगाडे, मोहम्मद इकबाल, अरुण झाडे, गजानन खंडाळे, गजानन हांडे, नंदू घोडेस्वार, फिरोज बेरा, सुनील झिलपे यांच्यासह महाविकास आधाडीचे नेते प्रामुख्याने सहभागी होते, यावेळी राष्ट्रपती यांचे नावे असलेले निवेदन ठाणेदार प्रशांत काळे यांना देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here